‘…तोपर्यंत शाळा सुरु करण्यास मोठा धोका’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
मुंबई| कोरोना (Corona) विषाणूनं गेल्या दोन वर्षापासून जनजीवन विस्कळीत करुन टाकलं आहे. कोरोना या महासाथीच्या रोगानं आणि त्याच्या नवनवीन व्हेरियंटनं चिंतेचं वातावरण पसरवलं आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
येत्या सोमवारपासून पुन्हा शाळा-महाविद्यालये सुरु करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय, ठाकरे सरकारनं घेतला आहे. या निर्णयांनंतर आता तज्ज्ञांनी मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यावरुन भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
शाळा सुरु केली तर मोठा धोका असल्याचं, तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. यातच तिसऱ्या लाटेनंही धडक दिली आहे. त्यामुळे जोपर्यंत मुलांचं लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणं योग्य नाही, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मुलांना कोरोना होऊन गंभीर इन्फेक्शन होऊ शकतं. अशी मुलं घरात गेल्यानंतर घरातील वयस्कर आणि इतर व्यक्तींना कोरोना पॉझिटिव्ह करू शकतात. घरातील इतर सदस्यांपर्यंत कोरोना पोहोचवू शकतात, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे आत्ता शाळा सुरु करण्यास धोका असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या –
मराठमोळा पुष्पा! अल्लू अर्जुनच्या मराठी ट्रेलरचा सोशल मीडियावर बोलबाला, पाहा व्हिडीओ
Instagramद्वारे आता कमवा बक्कळ पैसा, कंपनीनं केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा
हाॅलिवूडला मोठा धक्का! Marvelच्या सिरिजमधील अभिनेत्याचा अपघाती मृत्यू
Tata Motorsच्या सर्वच गाड्यांच्या किंमतीत मोठे बदल, आत्ताच जाणून घ्या नव्या किंमती
निव्वळ आनंद! किरण माने यांना मि
Comments are closed.