अनिल देशमुखांबाबत भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार (Ncp Mla) आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबत भाजप (Bjp) नेत्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. अनिल देशमुख 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये (Bjp) येण्यास इच्छुक होते, असं भाजप नेते आणि मंत्री गिरीष महाजन (Girish Bapat) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

गिरीष महाजन यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. गिरीष महाजन मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे.

मी तुरूंगात असताना मला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफिर मिळाली होती. जर मी ती स्विकारली असती तर महाविकास आघाडी सरकार तेव्हाच कोसळलं असतं, असं अनिल देशमुख म्हणाले होते.

ईडीने कारवाईची धमकी दिल्याने 40 आमदरांनी मूळ पक्ष सोडून भाजपसोबत सरकार स्थापन केलं, असा आरोप अनिल देशमुखांनी केला होता.

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे तब्बल 13 महिने जेलमध्ये होते. देशमुख यांना नोव्हेंबर 2021 मध्ये अटक करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-