एकनाथ खडसेंबाबत भाजप आमदाराचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव | भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी या निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून एकनाथ खडसे यांच्या पराभावासाठी प्रयत्न करण्यात आल्याचं मंगेश चव्हाण यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटलं आहे.

मंगेश चव्हाणग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी कुन्हा गावात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीपूर्वी मला अनेक राष्ट्रवादीच्या लोकांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की कोणाला सांगू नका, खडसे राष्ट्रवादीत आल्याने आमचा ताण वाढला आहे. खडसे यांचा पराभव करा, असं मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांचं नाव न घेता म्हटलं आहे.

चुकीच्या मार्गाने पैसे कमावल्यास ईडी मागे लागते. ज्यांच्या मागे ईडी लागली त्याचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे, असं त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-