नवी दिल्ली | रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल या तीन कंपन्यांची बँक खाती फ्रॉड खाती म्हणून घोषीत करण्यात आल्याची माहिती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे.
अनिल अंबानींच्या तीन कंपन्यांच्या बँक खात्यांचे ऑडिट केलं असता त्यात निधीचा दुरुपयोग, चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण आणि अफरा-तफरी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच तिन्ही खात्यांना ‘फ्रॉड’ यादीत टाकण्यात आलं आहे, असं बँकेने न्यायालयात सांगितलं आहे.
तिन्ही कंपन्यांची मालकी उद्योगपती अनिल अंबानी यांच्याकडे आहे. एसबीआयचा निर्णय अनील अंबानी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, एसबीआयच्या या निर्णयामुळे अनिक अंबानी यांना आगामी काळात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
थोडक्यात बातम्या-
राष्ट्रगीत सुरु असताना भारताचा ‘हा’ खेळाडू भावुक; सिडनीच्या मैदानावर अश्रू अनावर!
‘पोलीस भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा…’; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला इशारा
राहुल गांधी हे फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील- संजय राऊत
अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेची पोलिसांत तक्रार; पाहा काय आहे प्रकरण…
मुंबई उच्च न्यायालयाचा श्रीपाद छिंदमला दणका!