बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलआधी बंगळुरूला मोठा धक्का; विराट कोहलीने ‘या’ खास खेळाडूसाठी ठेवले 28 कोटी, पण…

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट लीगचे 31 सामने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. 29 सामने झाल्यानंतर उर्वरित सामने स्थगित केल्यामुळे बीसीसीआयला याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर उर्वरित सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. पण आयपीएल सुरू होण्याआधीच राॅयल चँलेंजर बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे.

मागील वर्षी श्रीलंकेचा स्टार गोलंदाज इसुरू उदाना ला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 50 लाखांना लिलावात घेतले होते. मात्र त्याला खरेदी करण्यासाठी बंगळुरुची त्यांच्याकडील सर्व 28 कोटी रुपये मोजण्याची तयारी होती. बंगळुरुचे क्रिकेट डायरेक्टर माईक हेसन यांनी मागच्या वर्षी झालेल्या लिलावानंतर याचा गौप्यस्फोट केला होता.

मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील एक प्रभावी खेळाडू म्हणून इसुरू उदानाला ओळखलं जातं. खालच्या फळीतला एक उत्तम फलंदाज म्हणून सुद्धा त्याच्यावर जबाबदारी होती. श्रीलंका संघासाठी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील एक प्रभावी खेळाडू म्हणून इसुरू उदानाला ओळखलं जातं.

श्रीलंका संघासाठी 21 वनडे व 33 ट्वेंटी सामने खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव होता. 2009 च्या वर्ल्डकपमध्ये त्याने पदार्पण केलं होतं. गेल्या दोन वर्षापासून श्रीलंका संघाचा नियमीत खेळाडू म्हणून तो खेळत होता. बंगळुरू संघाने खूप विश्वासाने मागच्यावर्षी झालेल्या लिलावात त्याला खरेदी केलं पण आयपीएलमधील त्याची कामगिरी साधारण होती.

थोडक्यात बातम्या

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार; नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

“अजित पवार सकारात्मकता दाखवतात पण, मुख्यमंत्री वेगळेच आदेश देतात”

राज्यपालांचे बोलविते धनी कोण?; संजय राऊतांचा सवाल

लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, प्रत्येकी ‘इतक्या’ हजारांची मदत मिळणार

“…तर पवारांची लोंबतेगिरी करणाऱ्या संजय राऊतांवर ही वेळ आली नसती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More