बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठा झटका! Quinton de Kockची अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) जाहीर केली आहे. अचानकपणे निवृत्ती जाहीर केल्यामुळे अनेकांना मोठा धक्काच बसला आहे.

भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत पराभव झाल्यानंतर क्विंटन डी कॉक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कसोटीतील पराभवानंतर क्विंटन डी कॉकच्या घोषणेनं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डी कॉकने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयानं त्याचे चाहतेही दुःखी झाल्याचं पहायला मिळतंय.

निवृत्तीच्या घोषणेविषयी बोलताना डी काॅकडनं म्हटलं की, पत्नी साशा हार्ली सध्या गर्भवती आहे. जानेवारी महिन्यात बाळ होणार आहे. या बाळाच्या स्वागतासाठी आपल्याला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. कारण कुटुंबच आपलं सर्वस्व आहे. त्यामुळे आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे.

दरम्यान, डी कॉक 29 वर्षाचा असून त्यानं खूप लवकर क्रिकेटच्या एकाफाॅरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. ही निवृत्ती त्यानं खूप विचार करुन घेतली असल्याचं म्हटलं आहे. डी कॉकने दक्षिण आफ्रिकेसाठी 38.83 च्या सरासरीने 54 कसोटी सामन्यात 3300 धावा केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

MARD Doctor Strike: कोरोनाचं सावट घोंगावत असताना डाॅक्टरांचा आजपासून संप

गोव्यात राडा: ‘या’ स्टार खेळाडूच्या पुतळ्यावरुन नवा वाद

Corona: राज्यात नवीन नियमावली जाहीर, ‘हे’ असणार नवे नियम

“माझा जास्त वेळ जुन्या गोष्टी शोधून त्या दुरुस्त करण्यातच जात आहे”

“दात पाडीन” म्हणत शिवसेना नेत्याची महिला पदाधिकाऱ्यावर आरेरावी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More