बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका; सरकार ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली | एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सध्या दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घेतल्या जाऊ शकतात. सरकार याबाबत लवकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सध्या भविष्य निधी योजना आणि मोफत विमानप्रवास अशा सुविधा मिळत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही वर्षातून ठराविकवेळा मोफत विमानप्रवास करता येतो. मात्र या सुविधा काढून घेतल्या जाऊ शकतात.

एअर इंडिया कर्मचारी संघटनेने नागरी उड्डाण मंत्रालयाकडे दादही मागितली होती. खासगीकरणानंतरही एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, भविष्य निर्वाह निधी, सुट्ट्यांचे पैसे मिळणे या सुविधा सुरुच राहिल्या पाहिजेत. या सुविधा कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी असल्याचे संघटनेचे म्हणणं आहे.

खासगीकरणानंतर एअर इंडियाचा ताबा दुसऱ्या कंपनीकडे गेल्यानंतर त्यांच्याकडूनही कर्मचाऱ्यांसाठी नव्या अटी-शर्ती लागू केल्या जाऊ शकतात. तसेच एअर इंडियाने नुकताच आपल्या काही मालमत्तांचा लिलाव केला होता. यामध्ये बईत एक रहिवासी प्लॉट आणि एका फ्लॅटची विक्री केली जाणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

जातीचा उल्लेख केल्यानं ‘मिस्टर आयपीएल’ वादाच्या भोवऱ्यात!

राज कुंद्रा प्रकरणातील एका नावामुळे मोठा गोंधळ, ‘या’ मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार- राजेश टोपे

‘तो कंटेट वल्गर होता, पण…’; राज कुंद्राच्या वकीलांचं स्टेटमेंट समोर

‘कोरोना जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत जेवणार नाही’; मंत्र्यानं केला मोठा निश्चय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More