काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या प्रभारी नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश!

छत्तीसगढ | छत्तीसगढमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. छत्तीसगडचे काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष आणि आमदार रामदयाल उके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अमित शहांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजप अध्यक्ष अमित शहा छत्तीसगढच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी उकेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान निवडणुका जवळ आल्या असताना काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

दरम्यान, रामदयाल उके हे चार वेळेस आमदार होते. 2000 त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा 17 वर्षानंतर त्यांनी घरवापसी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शबरीमला मंदिरात येणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करा!

-…म्हणून मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा देणार नाही-नितेश राणे

-त्याच्या आईने आंबा खाल्ला नसता तर हा *** तयारच झाला नसता- नितेश राणे

-या भाजप मंत्र्याची खुर्ची धोक्यात; चौकशी करण्याचे शहांचे आदेश!

-माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल!