बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वसामान्यांना मोठा धक्का! LPG सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या; पाहा नवे दर

नवी दिल्ली | देशांतर्गत दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल डिझेल बरोबरच LPG सिलेंडरच्या किंमतीत देखील वाढ अनुभवायला मिळाली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांच्या संतापाचा पारा चढत असतानाच आज पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 73.5 रुपयांची वाढ केली आहे. 73.5 रुपयांच्या वाढीसह व्यावसायिक सिलेंडर आता 1623 रुपयांना मिळणार आहे.

नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलेंडर धारकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच सर्वजण मेटाकुटीला आले असताना व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम आता खाद्यपदार्थांच्या किंमतींवर होणार आहे. यामुळे सरकारविरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस एलपीजी गॅसच्या चोरीचं प्रमाण वाढत चाललं आहे. यालाच आळा घालण्यासाठी तेल कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केले आहेत. याद्वारे ग्राहकांची ओळख पटवून सिलेंडर दिला जाणार आहे. ज्याअंतर्गत ग्राहकांना सिलिंडर घ्यायचा असल्यास मोबाईलवर ओटीपी मिळेल, त्याची सत्यता पडताळल्याशिवाय ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.

थोडक्यात बातम्या –

कोलकाता पाॅर्न रॅकेट प्रकरणात आणखी एका फोटोग्राफरला अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या आरोपात अटक

अखेर ‘या’ शहरात 15 ऑगस्टपासुन हेल्मेटसक्ती; हेल्मेटशिवाय पेट्रोलही मिळणार नाही

भर मंडपात नवरा सोडून भलत्यानेच केलं नवरीला किस अन्…

“आम्हाला कोणी थप्पड मारण्याची भाषा करु नये, अशी थप्पड मारू की…”

“पुरुषांच्या चुकीसाठी महिलांना दोष देणं कधी थांबवणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More