काँग्रेसमधून भाजपत आलेल्या हार्दिक पटेलांना मोठा धक्का!

गांधीनगर | 8 डिसेंबरला म्हणजेच आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद झाले आहे.

दोन राज्यांतील निवडणुकीचे निकाल येणार आहेत, पण सर्वांच्या नजरा हिमाचलपेक्षा गुजरातकडे लागल्या आहेत. आता निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हार्दिक पटेल पिछाडीवर आहेत. अहमदाबादमधल्या वीरमगाम मतदारसंघात हार्दिक पटेल निवडणुकीच्या मैदानात आहेत.

हार्दिक पटेल यांनी पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी लढा दिला. तिथूनच हे तरूण नेतृत्व उदयास आलं. हार्दिक पटेल यांनी आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र गुजरात निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

वीरमगाम विधानसभा हा पटेलांचा गड मानला जातो. म्हणूनच भाजपनं हार्दिक पटेलांना उमेदवारी देऊन विजयाचा विश्वास व्यक्त केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-