बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं. विरोधकांनीही या प्रकरणात राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यानंतर हे सर्व प्रकरण न्यायालयात गेलं.

महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या राजकीय नाट्यानंतर परमबीर सिंह यांच्यासह अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस कुलकर्णी यांच्या खंडपीठात अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या याचिकांवर सुनावणी झाली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे. परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती त्याबरोबरच जयश्री पाटील यांनी देखील गृहमंत्र्यांविरोधात याचिका दाखल केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआयला चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देऊन 15 दिवसांमध्ये परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने असं सांगितलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याची शक्यता कमी असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोना लसीसंदर्भात जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ महत्वाची मागणी

50 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतणार 82 वर्षांच्या चौकीदाराची प्रेयसी

“एक कोरोनाचा रुग्ण सापडला तर आजूबाजूची 20 घरं करणार सील”

AIIMS प्रमुखांचा देश पातळीवरील लाॅकडाऊनबाबत सरकारला महत्वाचा सल्ला

‘या’ कारणाने नवऱ्यानेच तिचा अश्लिल व्हिडीओ काढुन केला सोशल मिडियावर व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More