Manoj Jarange | 20 जानेवारीला मराठा समाज लाखोच्या संख्येने अंतरवली सराटी येथून निघाला आहे. आज मराठा आंदोलकांनी पुण्यात प्रवेश केला आहे. या मजलदर मजल करीत निघालेला मराठा समाज येत्या काही दिवसात मुंबई गाठणार आहे. मात्र याआधी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. यावर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने जरांगेंना धक्का देत त्यांना मोठे आदेश दिले आहेत.
मनोज जरांगे पाटलांना मोठा धक्का
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलीये. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. यानंतर जरांगेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखाल कळवण्यात यावं, असे आदेश कोर्टाने दिले. हायकोर्टाच्या या नोटीस देण्याच्या आदेशानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
Manoj Jarange | नोटीसला मनोज जरांगेंचं उत्तर
न्यायालय आम्हालाही न्याय देईल. न्यायमूर्ती आम्हालाही न्याय देतील. आमचेही वकील कोर्टात जातील. काय नोटीस आहेत ते बघू. आमचे वकील आहेत ते बघतील. न्याय मंदिर सगळ्यांसाठी आहे. त्यात काय एवढं घाबरण्यासारखं आहे? न्याय मंदिर आम्हालाही न्याय देईल. त्यात मला काही एवढं विशेष वाटत नाही, असं जरांगे म्हणाले.
न्याय मंदिरासमोर त्यांनी जी बाजू मांडली त्यावर त्यांना न्याय दिला. आमची बाजू आम्ही मांडू, आम्हालाही न्याय मंदिराचा दरवाजा उघडा आहे. न्याय मंदिर आम्हालाही न्याय देणार, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
विरोधाला विरोध करायचं असं नाही. पण माणुसकीने वागायला पाहिजे. आपण एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. मोर्चा काढण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांना दिला आहे. त्यामुळे ते देखील काढू शकतात, असं जरांगे म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Kangana Ranaut | ‘ड्रामा क्वीन’ नेमकं कुणाला डेट करतेय?, अयोध्येतील फोटोमुळे चर्चांना उधाण
Mira road | मीरारोड परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!
Manoj Jarange | आझाद मैदानात फक्त एवढ्याच लोकांना परवानगी; हायकोर्टाचे महत्त्वाचे आदेश
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांना कोर्टात बोलवा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश