आमदार बबनराव पाचपुतेंना मोठा धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

अहमदनगर | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आलेत. यात भाजप आमदार बबनराव पाचपुतेंना मोठा धक्का बसला आहे.

माजीमंत्री बबनराव पाचपुतेंचे गटाला धक्का देत त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंच पदाची निवडणुक जिंकली तर आमदार पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काष्टीत 17 पैकी पाचपुते गटाला 10 जागा मिळाल्या आहेत.

बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचे भाऊ सदाशिव पाचपुते यांचा मोठा वाटा होता. मात्र दोन वर्षांपूर्वी सदाशिव पाचपुते यांचे निधन झालं. त्यानंतर पाचपुते कुटुंबात संघर्ष सुरू झाला.

ग्रामपंचायत निवडणुकीत बबनराव पाचपुते यांच्या पॅनलला त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी आव्हान दिले. त्यामुळे बबनराव पाचपुते यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात होती.

दरम्यान, राजकारणात काका-पुतण्यांचा मोठा संघर्ष पाहायला मिळतो. यामध्ये बीडच्या (Beed) क्षीरसागर कुटुंबासह राज्यातील अनेक घराण्यामध्ये काका-पुतण्यांचा संघर्ष असल्याचं पाहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या-