नवी दिल्ली | देशातील सर्वात मोठी सहकारी बँक एसबीआयने (SBI) त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. SBIने सोमवारी त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिग रेट (MCLR) मध्ये 10 बेसिस पॉईंट्सने वाढ केली आहे.
SBIच्या या निर्णयानंतर बँकेचे होम लोन (Home Loan), पर्सनल लोन (Personal Loan), ऑटो लोन्स (Auto Loans) महागणार आहेत. तसेच ग्राहकांच्या ईएमआयमध्ये (EMI) देखील वाढ होणार आहे. हे नवे दर 15 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.
एमसीएलआरमध्ये (MCLR) वाढ झाल्याने ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना आधीच्या तुलनेत जास्त ईएमआय भरावा लागेल.
दरम्यान, 3 महिन्यांपर्तच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटसाठी 6.65 टक्केवारी ऐवजी 6.75 टक्के दर असणार आहे. तर सहा महिन्यांसाठी 6.95 ऐवजी आता 7.05 टक्के दर असणार आहे. सोबतच एक वर्षासाठीचा एमसीएलआर वाढून त्याचा दर आता 7.10 टक्के, दोन वर्षांसाठी 7.30 टक्के आणि तीन वर्षांसाठी 7.40 टक्के झाला आहे.
थोडक्यात बातम्या-
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचं मोदींना पत्र, केली ‘ही’ मागणी
धक्कादायक! शिवसेना आमदाराच्या पत्नीने राहत्या घरी घेतला गळफास
पोस्टाची भन्नाट योजना; सुरक्षित गुंतवणुकीच्या विचारात असाल तर आत्ताच गुंतवा पैसे
“राजकारण सोडून हिमालयात जायची संधी कोल्हापूरकरांनी दिली होती, पण…”
Comments are closed.