बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंकजा मुंडेंना मोठा धक्का! ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे भाजप नेत्यांच्या अडचणीत वाढ

पुणे | राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा ऊस घेतल्यानंतर त्यांची फसवणुक करणाऱ्या कारखानदारांचा खरा चेहरा समोर यावा आणि कारखान्याची खरी परिस्थिती सर्वांसमोर यावी म्हणून, कारखान्यांचा लेखाजोखा जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

चालू गळीत हंगामात कारखान्यांनी नियमित ऊसदर देणे. तसेच उशीर झाल्यास ऊसाची रक्कम देणे, वेळेत ऊसदर न दिल्यामुळं कारखान्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या आधारे चांगला, मध्यम आणि वाईट अशी वर्गवारी साखर आयुक्तालयाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी वरील निकषांच्या आधारे राज्यातील 44 साखर कारखान्यांना काळ्या यादीत टाकलं आहे.

या 44 कारखान्यांच्या काळ्या यादीत भाजप नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश झाला आहे. यात पंकजा मुंडेचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पांगरी आणि पन्नगेश्वर शुगर पानगाव इथल्या कारखान्यांचा समावेश आहे. तसेच सुभाष देशमुखांच्या लोकमंगल कारखान्याचा समावेश आहे. या कारखान्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने काळ्या यादीत टाकलं आहे.

दरम्यान, कारखान्यांच्या लेखाजोखाच्या यादीत पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश कारखाने चांगले म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकही कारखाना काळ्या यादीत नाही, असं या माहितीतून समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या –

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्याने ठोकला काँग्रेसला रामराम

“देशात ‘ही’ नवी पद्धत आलीये, काहीजण सुुपारी घेऊन काम करतात”

“अडसूळांना अटक होताच आजारी पडले, आता मुश्रीफांना कोणीच वाचवू शकत नाही”

“सरकार ‘त्या’ गोष्टींवर विचार करायला तयार, शेतकऱ्यांनो आंदोलन मागे घ्या”

‘भारत बंद’ दरम्यान दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू; पोलिसांनी सांगितलं ‘हे’ कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More