उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के; आता आणखी एका नेत्याने सोडली साथ

Shivsena UBT

Uddhav Thackeray | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला चोहोबाजूंनी गळती लागली आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्या गटात ओढण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. याच मोहिमेअंतर्गत राजन साळवी (Rajan Salvi) यांच्यानंतर आणखी बडे नेते शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला खिळखिळं करण्याचे प्रयत्न सुरू असून, पुणे (Pune) आणि सिल्लोड (Sillod) मध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

पुण्यात उपप्रमुखाचा राजीनामा, शिंदे गटात प्रवेश निश्चित

पुण्यात शिवसेनेचे शहर उपप्रमुख राजेश पळसकर (Rajesh Palskar) यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत ४० ते ५० कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. लवकरच हा प्रवेश एका विशेष सोहळ्यात होणार असल्याचे समजते. तब्बल २२ वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेले पळसकर यांनी अखेर उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केला.

“नव्यांना राम राम, निष्ठावंतांना थांब थांब”

राजेश पळसकर यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात पक्षातील बंडखोरी आणि कार्यशैलीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

“मी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यापासून शिवसेनेत प्रवेश केला आणि २२ वर्षे पक्षासाठी निस्वार्थपणे काम केले. अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यामुळे माझ्यावर गुन्हे दाखल झाले आणि तुरुंगातही जावे लागले. पण पक्ष वाढवण्यासाठी मी कधीही मागे वळून पाहिले नाही,” असे पळसकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

“आज पक्षात काही नेते राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करून, मोठी पदे मिळवून निघून जात आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असून, नवीन लोकांना मोठ्या पदांवर बसवले जात आहे. ‘नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब’ ही नवीन संकल्पना पक्षात सुरू झाली आहे, जी मला मान्य नाही,” असे पळसकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

पुण्यातील गळतीमुळे उद्धव सेनेला मोठा फटका

पुण्यातील शिवसेनेत राजकीय हालचालींना वेग आला आहे. पळसकर यांनी दिलेला राजीनामा आणि त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा होणारा पक्षप्रवेश उद्धव सेनेच्या संघटनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुण्यात होणाऱ्या मोठ्या बंडखोरीमुळे शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

News Title : Big shock to Uddhav Thackeray in pune  

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .