बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएल सुरु होण्याआधीच विराट कोहलीला मोठा धक्का, ‘ही’ भविष्यवाणी खरी ठरली तर…

मुंबई | विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने अलिकडच्या काही महिन्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांचा पराभव केला आहे. पण आजही त्याचे आयपीएल विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2016 मध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर त्यांचा सनरायझर्स हैदराबादकडून पराभव झाला. गेल्या सीझनमध्ये आरसीबीने प्लेऑफमध्येही प्रवेश केला होता, परंतु जेतेपद मिळविण्यास ते अयशस्वी ठरले.

माजी क्रिकेटर आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, यावर्षी आरसीबी संघ त्याच्या मागील हंगामाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकणार नाही. मला वाटते की यावेळी ते प्लेऑफसाठी पात्र होऊ शकणार नाहीत. गेल्या तीन-चार वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्यांचा शेवटचा हंगाम सर्वोत्कृष्ट होता, पण संघ शेवट शेवट भटकला. जर आरसीबी चांगली सुरुवात करत नसेल तर या संघास लीगमध्ये समस्या उद्भवू शकतात, असं त्याने सांगितलं.

विराट कोहली यावर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. त्याला यासाठी केशरी टोपी मिळेल. तो म्हणाला की आयपीएलमध्ये कोहली ज्या फॉर्मसह येत आहे. अशा परिस्थितीत त्याला अवघड जाणार नाही. विराटशिवाय रिषभ पंत, केएल राहुल आणि डेव्हिड वॉर्नरसुद्धा ऑरेंज कॅपचे दावेदार असू शकतात, असंही तो म्हणाला.

दरम्यान, आयपीएलचा 14 वा सिजन 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. पाच सामन्यांचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. चेन्नईचा संघ आपला पहिला सामना 10 एप्रिलला खेळतील.

थोडक्यात बातम्या – 

काल जुळ्या मुलांना दिला जन्म, आज कोरोनामुळे आईचा मृत्यू

आयपीएल सुरु होण्याआधीच धोनी फुल्ल फॅार्ममध्ये; CSKनं शेअर केला ‘हा’ व्हिडीओ

चुकून गोळी लागून झाला मित्राचा मृत्यू, अपराधी भावनेतून तीन जणांची आत्महत्त्या

फखर जमान रनआऊट प्रकरण, ‘या’ कारणामुळे क्विंटन डी कॅाकला क्लीनचीट!

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आता पुण्यातील ‘या’ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नाहीत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More