Top News क्राईम खेळ देश

युवराज सिंगला मोठा धक्का, या प्रकरणात अखेर FIR दाखल

Photo Credit- Facebook/Yuvraj Singh

नवी दिल्ली | मागील वर्षी भारतीय माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने इंस्टाग्रामवर लाईव्ह दरम्यान दलित समाजाविरोधात वक्तव्य केलं होतं. त्याने केलेल्या वक्तव्यामुळं हरियाणामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळात युवराज सिंगने भारताचा फलंदाज रोहित शर्मासोबत इंस्टाग्रामवर लाईव्ह संवाद साधला होता. त्यावेळी युवराजने दलित समाजाविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्यामुळं दलित ह्यूमन राईट्सचे संयोजक रजत कसलन यांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कलम 153, 153 अ, 295 आणि कलम 505 याशिवाय एससी, एसटी विभागांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच रजत कसलन यांनी युवराजला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणीही केली आहे. केलेल्या वक्तव्यामुळे युवराजला त्याच्या फॅन्सच्या टीकेलाही तोंड द्यावं लागलं होतं. त्यावेळी त्याने माफी मागितली होती.

दरम्यान, युवराज सिंगने भारतासाठी 40 टेस्ट, 304 वनडे आणि 58 टी-20 इंटरनॅशनल सामन्यामध्ये सहभाग घेतला होता. 2007 साली टी-20 वर्ल्डकप आणि 2011 साली वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमचा युवराज भाग होता.

थोडक्यात बातम्या-

विजय मल्ल्याचा बंगला खरेदी करणाऱ्या ‘या’ बड्या अभिनेत्याला ईडीनं केली अटक

बेफिकिरी नडणार! डिसेंबरनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या रुग्णसंख्येत एवढी वाढ

भारतासह ‘या’ दोन देशांमध्येही भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा

न्यायव्यवस्था खरंच जीर्ण झालीय का?; शरद पवार म्हणतात…

शेतकरी आंदोलन: देशात असंतोष पसरवण्याचा आरोप, 21 वर्षीय दिशा रवीला अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या