काँग्रेसमध्ये मोठी फूट?, हा आमदार भाजपात जाणार?
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख(Vilasrao Deshmukh) यांनी काॅंग्रेस पक्षासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे. ते शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. काॅंग्रेस पक्षातील एक विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं. त्यामुळं लातूरमधील देशमुख घराणं म्हटलं की सेंकदाचा वेळ न जाता डोळ्यासमोर काॅंग्रेस पक्षाचा हाताचा पंजा समोर येतो. पण आता त्यांचा मुलगा आमदार अमित देशमुख(Amit Deshmukh) हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत, तसं वक्तव्य एका बड्या नेत्यानं केलंय. त्यामुळं आता देशमुख कुटुंब हाताचा पंजा सोडून कमळ तर हाती घेणार नाही ना, नेमकं हे प्रकरण काय आहे, हेच आपण या आर्टिकलमधून जाणून घेऊयात.
भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्याबद्दल मोठं वक्तव्य करत राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात बोलताना निलंगेकर म्हणाले आहेत की, काॅंग्रेस नेते आणि आमदार अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर आहेत. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत ठेवण्यासाठी अमित देशमुख भाजपच्या वाटेवर आले आहेत.
पण निलंगेकर असं म्हणाले खरे पण पुढं त्यांनी अमित देशमुखांना भाजपमध्ये घेणार नसल्याचाही दावा केला आहे. ते म्हणाले की, अमित देशमुखांचा भाजप प्रवेश भाजप युवा कार्यकर्त्यांना आवडणारा नाही. त्यामुळं जरी अमित देशमुख भाजपमध्ये येण्यास इच्छुक असले तरी आम्ही त्यांना भाजपमध्ये घेणार नाही.
एकीकडं निलंगेकर यांनी अमित देशमुख भाजपमध्ये येण्यास इच्छुक असणार असं वक्तव्य केलंय तर दुसरीकडं आम्ही त्यांना पक्षामध्ये घेणार नाही, असा दावाही केलाय. त्यामुळं त्यांनी सर्वांनाच बुचकळ्यात पाडलं आहे.
देशमुख हे लातूरचे प्रिन्स राजकुमार आहेत. नेहमी सत्तेत राहावे , अशी त्यांची इच्छा असते. पण त्यांनी जनतेचे प्रश्न कधीच मांडले नाहीत, असा टोलाही निलंगेकर यांनी देशमुखांना लगावला आहे.
जर अमित देशमुखांनी भाजमध्ये प्रवेश करत कमळ हाती घेतले तर हा काॅंग्रेससाठी आणि लातूरकरांसाठीही मोठा धक्का असणार आहे . कारण त्यांच्या वडिलांनी काॅंग्रेस पक्षातूनच आपली राजकीय कारकिर्दी सुरू केली आणि शेवटपर्यंत काॅंग्रेस पक्षात राहूनच काम केलं.
महत्वाच्या बातम्या-
- दयाबेनची अवस्था झालीय फार वाईट, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
- “महाराष्ट्राला धक्का बसतील असे महाविकास आघाडीतील लोक भाजमध्ये येणार आहेत”
- टेंशन वाढलं! उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार
- “अमोल कोल्हेंना दाढी काढली तर कोणी ओळखतं का?”
- ‘ही दोन औषधं लहान मुलांना देऊ नका’; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा
Comments are closed.