नवी दिल्ली | कोरोना (Corona) महासाथीच्या रोगानं सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र आता हळूहळू सगळं शिथिल होत आहे. कोरोना आटोक्यात येत असल्यामुळे निर्बंध शिथिल केले जात आहेत. अशातच कोरोना पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) जगभरातल्या नागरिकांना वेगानं पसरणाऱ्या व्हेरियंटच्या बाबतीत अधिक सतर्क राहण्यास सांगितलं आहे.
कमी गंभीर स्वरूपाचा व्हॅरिएंट उदयास आला, तर लशीचा बूस्टर डोस किंवा नव्या फॉर्म्युलेशनची गरजही भासणार नाही. दुसरीकडे अत्यंत वाईट परिस्थितीत, कोविड-19 चा अधिक प्राणघातक आणि वेगानं फैलावणारा व्हेरियंट समोर येऊ शकतो, असं गेब्रियेसस यांनी सांगितलं आहे.
ओमिक्रॉन (Omicron) आणि डेल्टा (Delta) या व्हेरिएंट्सच्या (Variant) संयोगातून तयार झालेला डेल्टाक्रॉन (Deltacron) हा विषाणू (Virus) वेगानं फैलावतो.
प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास कोविड-19 च्या केसेसमध्ये आणि मृत्यूच्या संख्येत वेळोवेळी वाढ होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत असुरक्षित व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज भासू शकते, असं ते म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वधारले, वाचा ताजे दर
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोन्याच्या दरात वाढ, वाचा ताजे दर
मोठी बातमी! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू
Gudi Padwa 2022 : 2 वर्षानंतर साजरा होणार निर्बंधमुक्त गुढीपाडवा
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
Comments are closed.