बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाबाबत तालिबान्यांकडून मोठं वक्तव्य; म्हणाले….

काबूल | अफगाणिस्तानावर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे संपुर्ण जगाचं लक्ष आता अफगाणिस्तानवर लागून होतं. या परिस्थितीचा परिणाम अफगाणिस्तानच्या क्रिकेटवरही होणार अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासुन चालू होती. क्रिकेटपटू राशिद खाननेही इंग्लडमधून चिंता व्यक्त केली होती. परंतु नुकताच तालिबानच्या मोठ्या अधिकाऱ्यांने अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूची भेट घेऊन संघाला पाठिंबा दिला आहे. तसेच अफगाणिस्तानच्या क्रिकेटमध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हटलं आहे.

तालिबानी नेता अनस हक्कानी यांनी अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदी आणि क्रिकेट बोर्डचे माजी अधिकारी असदुल्लाह आणि नूर अली जादरान यांची भेट घेतली. यावेळी हक्कानी यांनी 1996 ते 2001 त्यांच्या सत्तेतच देशात क्रिकेटची सुरूवात झाली असुन आमचा क्रिकेटला कायम पाठिंबा आहे, असंही हक्कानी यांनी सांगितलं. यासंबंधित अफगाणिस्तानच्या आरियाना न्युजने माहिती दिली आहे.

तालिबान देशातील क्रिकेटपटूंच्या कायम सोबत राहणार आहे. तसेच त्यांना ज्या गोष्टीची गरज भासेल त्या सगळ्या गोष्टी त्यांना देण्यात येतील. त्याचबरोबर क्रिकेटला आमचा कायम पाठिंबा राहणार आहे, अशी आशाही हक्कानी यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या या परिस्थितीचा परिणाम शेजारील असलेल्या पाकिस्तानमध्ये सप्टेंबर महिन्यात न्युझीलंडचा संघ तर ऑक्टोबर मध्ये इंग्लंचडचा पाकिस्तानाचा दौरा करणार आहे. त्यामुळे  हे दोन्ही संघ पाकिस्तान दौऱ्यांवर येतील की नाही त्याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

थोडक्यात बातम्या-

अफगाणास्तानमधील वास्तव सांगताना खासदाराच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले…

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“‘या’ महिन्यात दोन लाख आयसीयु बेड तयार ठेवा”

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत ‘मोदी’ एक्सप्रेस, असा असणार मार्ग!

‘कुत्री कितीही भुंकली तरी…’; इंदोरीकर महाराजांचा निलेश लंकेंना पाठिंबा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More