बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…पण एका मंत्र्याची विकेट पडणार’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान!

कोल्हापूर | एकाच वेळी राज्यातील अनेक मंत्री दिल्लीला गेले असल्याने महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याची विकेट पडणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापुरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय वर्तुळात अनेक टीकाटिप्पणीला सुरुवात झाली. विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर याप्रकरणात टीकास्त्र सोडलं होतं. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही भाजपतर्फे करण्यात आली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आले असताना त्यांनी एकाच वेळी राज्यातील अनेक मंत्री दिल्ली दरबारी पोहोचले असल्याने महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा नक्की होणार, असं भाकीत केलं आहे. पत्रकारांनी ते मंत्री अनिल देशमुख आहेत का? असा प्रश्न विचारला असता ‘ते मला माहित नाही, पण एका मंत्र्याची विकेट पडणार एवढेच मी सांगू शकतो!’ अशा शब्दात चंद्रकांत पाटील व्यक्त झाले.

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते दिल्लीला पोहोचल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. वर्षभरात एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो, दुसऱ्याचा राजीनामा चर्चेत येतो आणि तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीच आलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे असं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.

थोडक्यात बातम्या – 

बुमराहला शुभेच्छा देणं मयंक अग्रवालला पडलं महागात, वाचा नेमकं काय झालं…

पेस्टकंट्रोल करणं कुटुंबाला पडलं महागात; पालशेतकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर!

अरे बापरे! बादलीभर ‘बिअर’ काही सेकंदात फस्त, पाहा आश्चर्यचकित करणारा हा व्हीडिओ

नरेंद्र मोदी यांच्या मुख्य सल्लागारांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा

‘शाकाहारी’ महिलेला चुकून ‘मांसाहारी’ पिझ्झा डिलिव्हर करणं पडलं महागात!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More