‘हे कृत्य सरकार पाडण्यासाठीचं पाऊल होतं’; सरन्यायाधीशांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी थेट राज्यपालांच्या कृतीवरच नाराजी व्यक्त केली. अत्यंत कडक शब्दात चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या कृतीवर ताशेरे ओढले.

राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली. त्यांचं हे कृत्य म्हणजे सरकार पाडण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीशांच्या या भूमिकेमुळे सध्या तरी ठाकरे गटाचं पारडं जड झालंय.

आमदारांनी जीवाला धोका आहे असं सांगितलं होतं. म्हणून राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं योग्य नव्हतं. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं असं दिसून येतं. सरकार पडेल असं कोणतंही कृत्य राज्यपालांनी करायला नको होतं, असं महत्त्वाचं वकतव्य सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलं आहे.

राज्यपालांनी असं करणं लोकशाहीसाठी खूपच घातक आहे. राज्यपालांना सुरक्षेबाबत पत्रं पाठवणं पुरेसं होतं. मात्र बहुमत चाचणीसाठी पत्र लिहिणं अयोग्य आहे. असं विश्वासमत मागणं लोकशाहीसाठी घातक. यावर मी व्यक्तिशा नाराज आहे. अशी घटना होणं राज्यासाठी निराशाजनक आहे, असं सरन्यायाधीश म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More