‘शरद पवारांचा हा पावर गेम होता’; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीने शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजीनामा फेटाळला आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांनीच राहावे असा ठराव केला आहे. याच संपूर्ण घडामोडीवर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांना डिवचलं आहे.

शरद पवार यांचा हा पावर गेम आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत कलह होता, त्यामुळे शरद पवार यांनी हा मास्टरस्ट्रोक दिला आहे. आता राष्ट्रवादीला नाविलाजास्तव एकत्र यावं लागणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

अजित पवार यांच्या चलबिचलपनाला ब्रेक बसला आहे. आता शांत बसणे हा एकमेव पर्याय आहे, राष्ट्रवादीतली चलबिचल आता शांत होईल. अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यांना महाराष्ट्राची धुरा स्वतःकडे घ्यायची आहे, असं ते म्हणालेत.

शरद पवार यांनी हे स्पष्ट केलं आहे की, माझी ताकत म्हणजे माझी ताकत आहे. शरद पवार काहीही उलथापालथ करू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे, असं शिरसाठ म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-