बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रशांत किशोर यांची भाजप विरोधात मोहिम?; प्रशांत किशोर-शरद पवार भेटीवर राष्ट्रवादीचा खुलासा

मुंबई | प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. सिल्वर ओकवर चाललेल्या 3 तासाच्या या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या या अचानक भेटीमुळे राजकिय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. त्यांच्या या भेटीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र, भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता भाजपला सत्तेत बसवणाऱ्या प्रशांत किशोर यांनी भाजप विरोधात मोहिम उघडली की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

दरम्यान, स्थालांतरीत मुस्लिमांचा मुद्दा, सीएए-एनआरसीचा मुद्दा चर्चेत आल्यापासून प्रशांत किशोर यांनी भाजपपासून चार हात लांब केले आहेत. नैतिकतेच्या मुद्यावरून निवडणूकीत मी मदत करेल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. गेल्या 4 वर्षात त्यांनी भाजप विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काही काळात केंद्रात भाजपविरोधात एक नवा पर्याय उभा करण्याच्या तयारीत प्रशांत किशोर दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

कोरोनातून देश सावरतोय; देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 70 दिवसांतील मोठी घट

‘मुस्लिमांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावं’; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

‘…तर पुनावालांना सुरक्षा देऊ’; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

शेतात पेरणी करतानाचा एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

अबब! केवळ 12 दिवसात तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागलं इंधन; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More