बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रीनगरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 14 जवान जखमी तर 5 गंभीर

श्रीनगर | श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 14 जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमी जवानांना रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती जम्मू कश्मीर पोलिसांनी दिली आहे.

आजूबाजूच्या परिसराची नाकेबंदी देखील करण्यात आली आहे. संध्याकाळी श्रीनगरच्या पंथा चौक भागात जेकेएपी 9व्या बटालियनच्या पोलीस बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 14 पोलीस जखमी झाले आहेत. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

हल्ला झालेल्या या भागात सुरक्षा दल पाठवण्यात आलं आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध सुरू करण्यात आल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांनी बसवर मोठ्याप्रमाणात गोळीबार केल्यानं बसमधील पोलिसांना बाहेर आता आलं नाही. मागील काही दिवसांपूर्वी असाच मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपू्र्वी मोठा कट देखील उधळण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पक्षाला रामराम

“एवढं तरी वाचायला हवं, इतकं बावळट असून चालत नाही”

टेंशन वाढलं! Omicron बाधित रूग्णाचा मृत्यू, खुद्द पंतप्रधानांनी केला खुलासा

अंकिता लोखंडेला आली सुशांतसिंह राजपूतची आठवण; साखरपुड्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

मनसे-भाजप युती होणार का?, राज ठाकरे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More