Top News पुणे महाराष्ट्र

धक्कादायक!; पुण्यातील भाजप आमदाराच्या घरात मोठी चोरी, इतक्या लाखाचे दागिने लंपास

पुणे | भाजपच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या घरी गेल्या महिन्यांत चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 18 लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. या घटनेलाही पंधरा दिवस झाले असतानाही तपासात कुठलिही प्रगती झालेली नाही. लॉकडाउननंतर घरफोड्यांच्या घटनांमध्ये प्रकर्षाने वाढ झाली असून पोलिसांचे त्याकडे होत असलेले दुर्लक्ष चिंतेचा विषय बनला आहे.

या प्रकरणी ममता दीपक मिसाळ यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिसाळ कुटुंबीय एका बंगल्यात राहते. आमदार मिसाळ यांच्यासह त्यांचे दीर, भाऊजय तसेच मुले या ठिकाणी राहत असून बंगल्यांच्या देखभालीसाठी काही नोकर आहेत. तक्रारदार ममता यांना 28 नोव्हेंबर रोजी लक्षात आले की त्यांच्या तिजोरीवर ठेवलेला हिरे, सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स चोरीस गेला आहे. त्यांनी याबाबत तत्काळ आपले पती दीपक मिसाळ तसेच आमदार मिसाळ यांच्या लक्षात चोरीचा प्रकार आणून दिला.

या प्रकरणी मिसाळ यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दाखल केली असून गेली पंधरा दिवस या घटनेचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी आमदार मिसाळ यांना विचारले असता त्यांनी घरात चोरी झाल्याचे सांगितले. पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत तपासात फारशी प्रगती झालेली नाही.

शहरातील आमदारांचीच घरे सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांची काय गत असणार आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिसाळ यांचा बंगला हा सुरक्षित असतानाही त्या ठिकाणी चोरी झाल्याने आजुबाजूच्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत. लॉकडाउन नंतर शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात येत असलेले अपयशामुळे या घटनांमध्ये दिवसागणिक वाढच होत असल्याने चिंता व्यक्त होतं आहे.

थोडक्यात बातम्या-

पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…; भाजपचा शिवसेनेला टोला

महासागराप्रमाणे खोली अन्…!म्हणत रोहित पवारांनी आजोबांना दिल्या खास शुभेच्छा

“…तर 2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाला पाहावा लगला नसता”

धक्कादायक! ‘द डर्टी पिक्चर’ मधील अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

जय जवान, जय किसान; वाढदिवसाच्यानिमित्त युवराज सिंगचं चाहत्यांना ‘खास’ आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या