बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल चोरांचा थेट पाईपलाईनवर डल्ला; पेट्रोलनं दोन विहिरी भरल्यानं महाराष्ट्रात खळबळ

सातारा | चोर कुठे दरोडा टाकतील आणि काय चोरी करतील याचा काही नेम नाही. पैसे, मौल्यवान दागिने, महाग वस्तू अश्या प्रकारच्या चोरीच्या घटना साधारण घडत असतात. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठया प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. महाग होणाऱ्या इंधनाकडेच चोरांनी मोर्चा वळवला आहे.

सातारा जिल्ह्यातील एका गावात चोरीचा एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. या वेळेस अटखोर चोरांनी पेट्रोल चोरी करण्यासाठी चक्क पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडली आहे. या घटनेचे विशेष म्हणजे, चोरट्यांनी पेट्रोल पाईपलाईन तशीच सोडून दिल्यामुळे परिसरात पेट्रोलच्या दोन विहिरीच भरल्या आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर या 223 किलोमीटर पाईपलाईनवर साताऱ्यातील सासवड गावाजवळ चोरट्यांनी दरोडा घातला आहे.

चोरट्यांनी लाखो रुपयांचे पेट्रोल चोरुन तिथून काढता पाय घेतला आहे. पेट्रोलची पाईपलाईन तशीच सोडल्याने त्या परीसरात मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा जमिनीत निचरा झाला असून, शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याने बघणाऱ्यांची गर्दी होत आहे.  गावात कोणताही चुकीचा प्रकार घडायला नको, याकरता पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही परिसरात हजर आहे.

पहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; ‘या’ कामात घोटाळा झाला का? होणार चौकशी

बिपाशा बासूचा हॉट अंदाज; नवऱ्याला म्हणाली ‘जळतंय माकडं’; पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 10 जणांचा मृत्यू, 995 पॉझिटिव्ह!

“सुशांत गेला यात माझी काय चूक?”; भडकलेल्या अंकिताचा व्हिडीओ व्हायरल

तुमचं खातं SBI मध्ये असेल तर सावधान; अशाप्रकारे घातला जातोय गंडा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More