Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. महायुतीतील नाराज नेत्यांची शरद पवारांच्या पक्षात जाण्यासाठी रिघ लागल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात येणाऱ्या नेत्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे महायुतीचं टेंशन वाढलं आहे.
महायुतीचं टेंशन वाढलं
सोलापूर जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटातील दोन नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी काल जयंत पाटालांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाचे (Assembly Election 2024) आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत देशमुख बंधूंनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. जयंत पाटलांच्या उपस्थितीत टेभुर्णीच्या सुरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख या बंधूंनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे.
दरम्यान, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांचे आपले पत्ते एक-एक करुन उघड करायला सुरुवात केली आहे.
Assembly Election 2024 | भाजपला मोठा धक्का
शरद पवारांनी भाजपला देखील मोठा धक्का दिलाय. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणाऱ्या समरजीत घाटगे यांना गळाला लावून भाजपला मोठा धक्का दिला आहे. समरजीत घाटगे आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात दंड थोपटतील.
महत्त्वाच्या बातम्या-
निवडणुकीआधीच भाजपला मोठे झटके; यादी जाहीर होताच राजीनाम्याची लाट
महत्वाची बातमी! तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदलला
“अरे मर्दांनो उठा, त्या ‘फिक्की’चा माज उतरवा..”; पुष्कर जोग निक्की तांबोळीवर भडकला
दुलिप ट्रॉफी स्पर्धेला सुरवात; जाणून घ्या स्पर्धेची A टू Z माहिती
गणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट किंमती