बंगळुरू | काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांची एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप समोर आली होती. यानंतर मोठी खळबळ उडाली. याप्रकरणावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेनंतर जारकीहोळी यांनी राजीनामा दिला होता.
बदनामीसाठी राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा जारकीहोळींनी सुरुवातीला केला होता. अखेर जारकीहोळींना राजीनामा द्यावा लागला. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. ज्या सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीमुळे भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला, त्याच कार्यकर्त्याने आपली तक्रार मागे घेणार असल्याचं म्हटलं आहे.
जनता दल सेक्युलरचे नेते एच डी कुमार स्वामी यांनी या प्रकरणाचा सौदा पाच करोड रुपयांत केला असल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे आपण दुखावलो आहे, त्यामुळे संबंधित तक्रार मागे घेत असल्याचं स्पष्टीकरण दिनेश कल्लाहल्ली यांनी दिलं आहे.
दरम्यान, राज्यात खूप मोठं षडयंत्र रचण्यात आलं आहे. सध्या देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अशात चार तपास यंत्रणा रमेश जारकीहोळी यांची ‘बदनामी’ करण्यात व्यस्त आहेत. अशा प्रकारच्या षडयंत्रातून निवडणुकांपूर्वी भाजपवर चिखलफेक केली जात आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही बालचंद्र जारकीहोळी यांनी केली आहे, असा आरोप जारकीहोळी यांच्या भावाने केला आहे.
थोडक्यात बातम्या-
जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना अनोेखी भेट; पाहा व्हिडिओ
राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला राज ठाकरेंची चिंता; पत्राद्वारे केली मास्क घालण्याची विनंती
ऑनलाईन सत्र सुरू असताना वकिलाचा कॅमेरा ऑन राहिला अन्…, पाहा व्हिडिओ
बारामतीच्या ‘त्या’ रिक्षाचालकाच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर!
‘कृषी कायदे मागे घेऊन सरकारने माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी’; दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
Comments are closed.