बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!

कराड | पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या चर्चेत आली आहे. सहकारी साखर कारखान्यातल्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्यानं आणखी रंगत निर्माण झाली आहे. काँग्रेस नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी इंद्रजीत मोहिते यांच्या रयत पॅनेलला पाठिंबा जाहीर केल्यानं सर्वत्र आता एकच चर्चा चालू झाली आहे.

विश्वजीत कदम यांनी इंद्रजीत मोहिते यांच्या रयत पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. कृष्णा कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आपण रयत पॅनेलला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि दुसरे माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते यांना एकत्र आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांनी प्रयत्न केले होते.

सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडून सुरेश भोसले आणि अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता त्यांच्याविरोधात कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश भोसले यांच्या संस्थापक पॅनल आणि इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनलचं आव्हान असणार आहे. मात्र आता विश्वजीत कदम यांनी इंद्रजीत मोहिते यांच्या रयत पॅनेलला पाठिंबा जाहीर केल्यानं सत्तासमिकरणं बदलताना दिसत आहेत.

दरम्यान, निवडणूकीसाठी 47 हजार 700 एवढी सभासद संख्या आहे. येत्या 29 जूनला ही निवडणूक होणार आहे. तर याचा निकाल हा 1 जुलै रोजी लागणार आहे. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणूकीपेक्षा आता ही सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अधिक निर्णायक ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

आई बापाच्या कष्टाचं चीज, पंढरपुरातील मजूराच्या पोराची इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड

“शिवसेना हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्याही पुढे गेली”

चिंताजनक! म्युकरमायकोसिसमुळे मुंबईत तीन लहान मुलांचे डोळे काढावे लागले

“महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही”

“तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More