मुंबई | बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. मात्र या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे.
एकीकडे भाजप नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भाजपचेच नेते कृष्णा हेगडे हे धनंजय मुंडेंच्या मदतीला धावले आहेत.
धनंजय मुंडेंच्या विरोधात आरोप करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार करण्यासाठी भाजप नेते कृष्णा हेगडे पोलिस स्थानकात दाखल झाले आहेत. 2010 पासून ही महिला ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे. रेणू शर्मा आणि माझी भेट झाली होती. माझ्याबरोबर संबंध ठेवायचे नाही का?, असं तिने त्यावेळी विचारल्याचं हेगडे यांनी सांगितलंय.
मुंडेवर आरोप झाल्यानंतर मी टायमिंग साधला असा कोणताही प्रकार नाही. ती ब्लॅकमेल करतीय, म्हणून मी पुढे आलो, असं कृष्णा हेगडे यांनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू- शरद पवार
धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“घरात उकिरडा माजलाय आणि राष्ट्रवादीचे नेते जगाला शहाणपण शिकवतात”
“मुंडे, मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा”
जावयाच्या चुकीची शिक्षा सासऱ्याला का व्हावी?- जयंत पाटील