Top News महाराष्ट्र

‘पूजाने आत्महत्या केली नाही तर…’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट!

Photo Credit- Pooja chavan instgram account

पुणे | राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. त्यामुळे विरोधकांनीही हे प्रकरण लावून धरलं आहे. मात्र अशातच पूजासोबत असलेल्या दोघा मित्रांनी पोलिसांना धक्कादायक असा जबाब दिला असल्याची माहिती समजली आहे.

पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली असा जबाब दिल्याचं कळतंय. आत्महत्या केली तेव्हा पूजासोबत अरुण राठोड आणि विलास चव्हाण हे दोघे सोबत होते. त्यामुळे त्या रात्री नेमकं काय घडलं हे दोघे सांगू शकतात. त्यांनी दिलेल्य जबाबानुसार पूजाला चक्कर आली आणि ती पडली. मात्र खरं काय ते तपासात समोर येईल.

पोलिसांना पूजा चव्हाणच्या फ्लॅटवर वाईनच्या बाटल्या सापडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नेमकी आत्महत्या की अपघात हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र सोशल माध्यमांवर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे या प्रकरणात कथित मंत्र्याचं नाव घेतलं जात आहे. शिवसेनेचे नेते मात्र याबाबत अधिक स्पष्टपणे बोलत नाहीत.

पूजाच्या जाण्याने तिच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. पूजाचे घरचे परळी शहरात राहतात. तर माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी करा अशी मागणी पूजाच्या वडिलांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

घरकाम करणाऱ्या तरूणीसोबत पोलीस अधिकाऱ्याने केलं हे धक्कादायक कृत्य

“प्रियंका गांधी दुर्गेचा अवतार, त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार”

तो मरता मरता वाचला, म्हणतो टाटानेच केला चमत्कार!

“माझी सत्ता, माझी मनमानी असा राज्य सरकारचा कारभार चाललाय”

टिकटाॅक युजर्ससाठी खूशखबर, भारतात टिकटाॅक पुन्हा होणार सुरू??

…मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या