Ladki Bahin Yojana | महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना(Ladki Bahin Yojana) सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न दोन लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.
महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना दीड हजार नव्हे तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता सरकार आल्यानंतर डिसेंबरचा हफ्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) मोठी अपडेट आहे, ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहित लागली.
…अन्यथा 2100 रूपये मिळणार नाहीत
या योजनेतील ज्या महिलांच्या आर्जाची छाणणी बाकी होती, ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली. मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरीत अर्जाची छाणणी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे.
जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि अर्ज पुन्हा भरला नाही तर त्यामुळे खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल करिना कपूरचं वक्तव्य; म्हणाली, “माझ्यासाठी मोठा….”
मणिपूरमधून हादरवून सोडणारी बातमी समोर; वाचून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल
ऐश्वर्याच्या चाहत्यांना धक्का, घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब!
भाजपची मोठी रणनीती; फक्त ‘या’ नेत्यांनाच मंत्रिमंडळात संधी मिळणार?
ब्रेकिंग! PM मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आलेल्या कॉलने खळबळ