Sharad Pawar | लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात काही मतदारसंघावरून दोन्ही आघाड्यांमध्ये पेच पाहायला मिळतो आहे. अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप पूर्ण झालं नसून उमेदवारांच्या याद्याही जाहीर होणं बाकी आहे. महाविकास आघाडीतही काही जागांवर तिढा असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता हा तिढा सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माढा लोककसभेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
माढ्याचा तिढा सुटणार?
12 एप्रिलला माढा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच उमेदवार मोहिते पाटील किंवा निंबाळकरांच्या घरातील असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. 16 एप्रिलला माढा मतदारसंघातून पवार गट अर्ज दाखल करणार असल्याची माहिती देखील समोर येत आली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून स्वत: शरद पवार (Sharad Pawar) लोकसभा निवडणूक लढतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांचीही तशी भावना आहे. शिवाय इतरही काही नेत्यांनी शरद पवारांकडे लोकसभेचं तिकीट मागितलं आहे.
मोहिती पाटील की देशमुख?
शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि शेकापचे अनिकेत देशमुख यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) यांनी शरद पवारांची भेट घेतली.
गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबतची माहिती खुद्दे जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितली होती. मात्र, अद्याप कोणाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही.
दुसरीकडे अनिक देशमुखांनी शरद पवार यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार मोहिते पाटील की देशमुख अशी चर्चा सुरु झालीये.
महत्त्वाच्या बातम्या-
आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, प्रकाश आंबेडकर होकार देणार का?
अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिक्षकाला बेदम मारहाण!
13 वर्षांच्या मुलीच्या प्रसंगावधानाने आनंद महिंद्रा झाले चकित; थेट दिली नोकरीची ऑफर
मोठी बातमी! ‘हा’ बडा नेता भाजपात घरवापसी करणार?
गुढीपाडव्याला बनवा स्वादिष्ट आम्रखंड, जाणून घ्या खास रेसिपी