बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्रा प्रकरणात मोठी अपडेट; आता शिल्पा शेट्टी बनणार साक्षीदार

मुंबई | उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला. अनेकांनी समोर येत याप्रकरणाविषयी अनेक खुलासे केल्याचं पाहायला मिळालं. अनेक आरोप-प्रत्यारोपांची खेळी पाहायला मिळाली. अशातच आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.

राज कुंद्रा मुख्य आरोपी असलेल्या अश्लील व्हिडीओ प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी 1500 पानी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. या पुरवणी आरोपपत्रात काही साक्षीदार दाखवण्यात आले आहेत. यातच या प्रकरणी राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीदेखील साक्षीदार बनणार असल्याचं समोर येत आहे.

राज कुंद्रा 19 जुलै 2021 पासून तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत आहे. त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आता आज 16 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या आणि शिल्पा शेट्टीच्या कुटुंबियांच्या अडचणींत वाढ झाली. राजच्या अटकेनंतर मीडियाचाही खूप प्रभाव त्यांच्या वैयक्तिक जीवनावर पडलेला पाहायला मिळाला. आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा

उत्तर प्रदेशचं रणांगण जिंकण्यासाठी आठवलेंचा भाजपला सल्ला, राजकीय गणितेही सांगितली!

बॉसनं पगार न दिल्यामुळे पठ्ठ्यानं उचललं धक्कादायक पाऊल…, पाहा व्हिडीओ

‘लहान मुलं कोरोनामुक्त झाले तरी…’; संशोधनातून चिंतेची बाब समोर

केंद्र सरकारची पशुपालकांसाठी मोठी घोषणा, ‘इतके’ लाख जिंकण्याची संधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More