संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत मोठी अपडेट

Dhananjay Deshmukh | मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांची प्रकृती खालावल्याची मोठी बातमी समोर येत आहे. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. “१६४ चा जबाब  मला द्यायचा आहे, परंतु तब्येत खालावल्यामुळे अशक्तपणा आला आहे, डिहायड्रेशन  झाले आहे. त्यामुळे हॉस्पिटलला (Hospital) जाणार आहे तपासणीसाठी,  मी फीट असेल तरच आज जबाब देणार आहे,” असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

भावाच्या मृत्यूमुळे डिप्रेशनचा (Depression) सामना

“घरातली परिस्थिती, त्यात सारखा भावाचा विचार येतो. बाहेर निघालं की जीवाला त्रास होतोय, कधीच आम्ही एकमेकांना सोडून कोणतं काम केलं नाही. मला डिप्रेशन आल्यासारखं वाटत आहे,” असेही ते म्हणाले. धनंजय देशमुख आज रुग्णालयात जाण्याची शक्यता आहे.

उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या नियुक्तीबाबत आशावादी

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. यावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, “मुख्यमंत्री साहेब (Chief Minister) आणि उज्वल निकम यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. आमची मागणी होती उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आज किंवा उद्या माहिती मिळेल. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, योग्य रीतीने सगळं कामकाज सुरू आहे, पोलीस असतील, एसआयटी असेल, सीआयडी असेल, न्यायालय समिती स्थापन झाली आहे आणि आता उज्वल निकम यांची नियुक्ती हे सगळं न्याय देण्याच्या भूमिकेत आहे.” (Dhananjay Deshmukh)

पोलीस चौकीची (Police Chowki) मागणी

“खंडणीच्या (Extortion) घटनेत जे आरोपी (Accused) आहेत, त्यांना जर योग्य शिक्षा झाली असती, ते कायदा व सुव्यवस्था (Law and Order) यांच्या कचाट्यात सापडले असते, तर पुढची घटना घडली नसती. पुढच्या काळात कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे.”

“या भागात एखादी पोलीस चौकी असायलाच पाहिजे, जेणेकरून काही गोष्टी झाल्या तर अलर्ट (Alert) राहता येईल, लोकांना अडचणी येणार नाहीत. लोकांना आपल्या तक्रारी दाखल करता येतील, लोकांची सोय होईल,” अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

Title : Big Update on Dhananjay Deshmukh health  

महत्वाच्या बातम्या- 

मंगळाचा नव्या राशीत प्रवेश, 68 दिवसांच्या आत ‘या’ राशींना अचानक होईल धनलाभ

सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांबद्दल समोर आली धक्कादायक माहिती

नांदेडकरांचा मुंडे बंधू-भगिनींना विरोध; पंकजा आणि धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढली

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढला?, आठव्या वेतन आयोगानंतर मोठा बदल

भाच्यानं आपल्या मामीलाच पटवलं, मामाला कळालं तेव्हा घडला मोठा अनर्थ