मुंबई | शिवसेनेतील (Shivsena) शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रेबाबत होणाऱ्या सुनवणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. येत्या 13 ऑक्टोबरला ही सुनवणी पार पडणार होती. मात्र या तारखेबद्दल करण्यात आले असून 13 ऑक्टोबरला होणारी सुनवणी 12 ऑक्टोबरला होणार असल्याचं माध्यमांकडून समजण्यात आलं आहे.
तारखेत बद्दल करण्याचं कारण काय?
दिल्लीत जी 20 (G-20) अध्यक्षांची बैठक होणार असल्याने वेळापत्रकात (TimeTable) बदल करण्यात आला आहे. 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी 13 ऑक्टोबरऐवजी 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता होणार आहे. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
कसं असेल आमदार अपात्रतेचं वेळापत्रक?
12 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरच्या दरम्यान आमदार अपात्रतेच्या संदर्भात युक्तीवाद होणार आहे. 23 नोव्हेंबरच्या दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होईल. दरम्यान ठाकरे (Thackeray) गटाने सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेण्यात यावी त्यामुळे उद्या सुनावणी होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर वेळकाढूपणा करत असल्याचं म्हणत नार्वेकरांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रात खळबळ… मोठ्या मॅटरमध्ये शिंदेंच्या खास मंत्र्याचं नाव!
राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा: आता मुली होणार लखपती!
मोठी बातमी: अजित पवारांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा
टोलवरुन ‘हे’ बडे नेते अडचणीत!, राज ठाकरेंनी थेट लावले व्हिडीओ