बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट, डाॅक्टर म्हणाले…

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून गानकोकीळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नाही. बऱ्याच दिवसांपासून त्या दवाखान्यात दाखल होत्या. अशातच आता त्यांच्या प्रकृतीविषयी अपडेट समोर येत आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून लता मंगेशकर आयसीयूमध्ये दाखल होत्या. आता हळूहळू त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं पहायल मिळत आहे. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं डाॅक्टरांनी सांगतिलं आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर सपोर्ट काढण्यात आला आहे. त्यामुळे आता थोडीशी चिंतेची बाब कमी झाली आहे. मात्र अजूनही काळजी घेण्याची गरज असल्याचं डाॅक्टरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 92 वर्षीय लता मंगेशकर यांना 8 जानेवारी 2022 रोजी कोरोना संसर्ग झाल्याने ब्रीच कॅंडीरूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर वयोमानानुसार त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. त्यामुळे लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचं डाॅक्टरांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

प्रियंका गांधीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, “वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी…”

…म्हणून सलमान आणि शेहनाजला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

“मोदी सरकारने देशद्रोह केला आहे”; राहुल गांधींचे केंद्रावर गंभीर आरोप

एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा शेवटचा इशारा, म्हणाले…

‘या’ नागरिकांना मिळणार स्वस्त दरात पेट्रोल, सरकारची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More