पुणे | मनसेने रविवारी पुण्यात सभा होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. शहरात गणेश कला क्रीडा मंच येथे रविवार 22 मे रोजी सकाळी 10 वाजता सभा होणार असल्याची माहिती मनसेने दिलीये.
शनिवारी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्याने राज ठाकरेंच्या सभेचा दिवस बदलण्यात आला असल्याची माहिती समोर आली होती. स्वतः राज ठाकरे पुण्यातील सभेबद्दल माहिती देतील असंही सांगण्यात आलं होतं.
सुरुवातीला सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे सभेची जागा निश्चित करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर मुळा – मुठा नदीपात्रात जाहा फिक्स करण्यात आली. पण पावसाचं कारण देत ही सभा रद्द करण्यात आली.
दरम्यान, पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे कोणत्या विषयावर बोलतील. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! काँग्रेसला जोर का झटका; 50 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या नेत्याचा भाजपत प्रवेश
“महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”
‘जसं मथुरेच्या कणाकणात कृष्ण आहे तसं…’; कंगणाचं नवं वक्तव्य चर्चेत
“महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल”
‘कोण किरीट सोमय्या?’, संजय राऊतांचा सोमय्यांवर घणाघात
Comments are closed.