बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

TET घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, आणखी एका बड्या अधिकाऱ्याला अटक

पुणे | टीईटी पेपर फुटी (TET Exam Paper Leak) प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांच्यावरील कारवाईनंतर पुणे पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

पुणे पोलिसांनी परिक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. डेरे यांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणातील आरोपींची संख्या 5 वर पोहोचली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली असून डेरे यांच्या अटकेनंतर पेपरफुटी प्रकरणातील इतर धागे दोरे हाती लागण्यास मदत होणार आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने याशिवाय आणखी एक धडक कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात बंगळुरुमधूनही एकाला ताब्यात घेतलं आहे. जी. ए. सॉफ्टवेअरच्या एका संचालकाला अटक केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणात अजूनही काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं  समजत आहे.

दरम्यान, टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारावरून तुकाराम सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरुन तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता तुकाराम सुपे यांना अटकेच्या तारखेपासून निलंबित करण्यात आलं आहे.

थोडक्यात  बातम्या-

अखेर चिंता मिटली! Omicron बाबत दिलासादायक माहिती आली समोर

एसटी संप मागे! संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांची मोठी घोषणा

म्हाडाची परिक्षा ऑनलाईन पद्धतीनेच; पेपर फुटीनंतर नवी तारीख जाहीर

‘…कदाचित खूप उशीर झाला आहे’; Omicron बाबत धक्कादायक माहिती आली समोर

पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकारची मोठी कारवाई; आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More