‘बिग बाॅस 14’ ची विजेती रुबीना दिलैक लवकरच करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण!
मुंबई | लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बाॅसची प्रत्येक वर्षीच एक अनोखी क्रेझ पाहायला मिळत असते. प्रत्येक वर्षी हटके काहीतरी पाहायला मिळत असते. गेल्या वर्षीच्या ‘बिग बाॅस 14’ सीझनची विजेती राहिलेली अभिनेत्री रुबीना दिलैक तुफान चर्चेत आली होती. बिस बाॅसनं तिला प्रचंड लोकप्रिय करुन टाकलं होतं. तिचा सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच बोलबाला पाहायला मिळत असतो. अशातच पून्हा एकदा ती चर्चेचा विषय ठरत आहे.
‘बिग बाॅस 14′ या रियॅलीटी शोची विजेता अभिनेत्री रुबीना दिलैकनं शोमध्ये तिच्या सौंदर्याची आणि व्यक्तिमत्त्वाची लोकांच्या मनावर वेगळी छाप पाडली. आता रुबीना दिलैक लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रुबीना लवकरच ‘अर्ध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
छोड्या पडद्यावर रुबीना प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे अनेक चाहते आहेत. आता ती मोठा पडदाही गाजवण्यासाठी सज्ज आहे. तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहतेही भरपूर उत्सूक असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, रुबीनासोबत या चित्रपटात ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेता हितेन तेजवानी आणि कॉमेडियन राजपाल यादव देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबर महिन्यात सुरू होणार असून हा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता रुबीनाला मोठ्या प़डद्यावर भूमिका साकारताना पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
मुख्यमंत्र्यांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन; पहिल्यांदाच दिसले विनामास्क
खायला डब्बा दिलाय पण तो रिकामाच, संजय राऊतांची घटना दुरूस्तीवरून केंद्रावर टीका
राखी सावंतचा भालाफेकीचा कारनामा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
उर्वरित आयपीएल सामन्यांसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ नियमात केले बदल
“पंकजा मुंडे माझ्या बहिण, त्यांनी अजून भावाला त्यांचं दु:ख सांगितलं नाही”
Comments are closed.