बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर प्रतिक्षा संपली!; ‘बिग बाॅस 15’ च्या घराची पहिली झलक आली समोर, पाहा व्हिडीओ

मुंबई | छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. ‘बिग बॉस 15’ च्या तयारीला सुरुवात झाली आहे. चाहते देखील शो ची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र यावेळी हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. सहा आठवड्यांनंतर हा कार्यक्रम टीव्हीवरून प्रसारित होणार असल्याचंही निर्मात्यांनी सांगितलं आहे. अशातच आता ‘बिग बाॅस 15’ ओटीटीच्या घराची पहिली झलक समोर आली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये घराचा प्रत्येक कोपरा दाखवण्यात आला आहे. बिग बाॅसचे नवीन घर, नवीन सीझन, नवीन, स्पर्धक, नवीन सूत्रसंचालक या सीझनची उत्सूकता वाढवत आहेत. आत्ता फक्त काही दिवसांची प्रतीक्षा आहे. आम्ही आरतीचं ताट घेऊन तयार आहोत, असं कॅप्शन टाकत बिग बाॅसच्या घराचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

बिग बाॅसचे चाहते नव्या सीझनसाठी चाहते भरपूर उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता बिग बाॅस 15 च्या स्पर्धकाची झलक समोर येत आहे. यावर्षी नेहमीप्रमाणं सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना सलमान खान दिसणार नाही. मात्र त्याच्याऐवजी करण जोहर ही जबाबदारी पार पडणार असल्याचं समजतंय. हा शो टीव्हीवर प्रसारित होण्याच्या 6 आठवड्यांपूर्वी वूटवर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, या वर्षी गेल्यावर्षीपेक्षा अजून काय मसालेदार मनोरंजन होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे नवे स्पर्धक चाहत्यांच्या मनावर किती छाप सोडून जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात”

पत्नीनं केलेल्या आरोपांनंतर अखेर हनी सिंगनं सोडलं मौन, म्हणाला…

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ‘ही’ 3 मंदिरे बंद; प्रवेशद्वारातूनही मिळणार नाही दर्शन

“ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी कोरोना विरोधातलं अमृत प्राशन केलंय का?”

सामन्यानंतर दीपक पुनियाच्या प्रशिक्षकानं केली रेफरीची धुलाई!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More