Bigg Boss 17 | कोण ठरणार ‘बिग बॉस’चा विजेता?, ‘या’ दोन स्पर्धकांमध्ये होणार फिनालेसाठी चुरस!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bigg Boss 17 | यंदाचा बिग बॉसचा हंगाम इतर हंगामापेक्षा अधिक मनोरंजक ठरला आहे. त्यामुळे बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ दिसून आली. शोचा फिनाले आता जवळच आला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या (Bigg Boss 17) ट्रॉफीवर कोण बाजी मारणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिग बॉस 17 ला आपले टॉप 5 स्पर्धकदेखील मिळाले आहेत. शो सुरू होऊन शंभर दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता फिनालेकडे लागल्या आहेत. काही रिपोर्टनुसार फिनालेमध्ये फक्त दोन स्पर्धकांना चान्स मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या दोघांपैकी कोण विजेता ठरणार, याबाबत चर्चा रंगत आहेत.

‘या’ दोन स्पर्धकांना चाहत्यांची अधिक पसंती

या आठवड्यात बिग बॉसमधील (Bigg Boss 17)  स्पर्धक अंकिता लोखंडेचा पती विकी जैन शोमधून बाहेर पडला आहे. यानंतर मुनव्वर फारूकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे टॉप 5 मध्ये सामील झाले आहेत. मात्र, या टॉप 5 मधूनची काहींचा पत्ता कट झाल्याचे म्हटले जात आहे.

फिनाले विकच्या वोटिंग ट्रेंडनुसार सर्वांत पुढे कॉमेडियन मुनव्वर फारुकी दिसून आला. मुनव्वरला चाहते अधिक वोट देत आहेत अगदी सुरुवातीपासूनच त्याने घरात छाप सोडली आहे. त्यामुळे सध्या तरी मुनव्वर फारुकी सेफ झोनमध्ये आहे. मुनव्वरला 1 लाख 92 हजार व्होट मिळाले असल्याचे म्हटले जात आहे. तर, मुनव्वरनंतर अभिषेक कुमारला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यामुळे फिनाले मुनव्‍वर फारूकी आणि अभिषेक कुमार यांच्यातच होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुनव्‍वर फारूकी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला. त्याच्यावर अनेक मुलींना एकाच वेळी डेट करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे मुनव्‍वरसाठी चाहत्यांमध्ये क्रेझ दिसून आली. तर, दुसरीकडे अभिषेक कुमार देखील कायम वादात दिसून आला. हे दोन्ही स्पर्धक वोटिंगमध्येही आघाडीवर असल्याने फिनाले यांच्यातच होणार असल्याचे आता म्हटले जात आहे.

टॉप 5 मधून कुणाचा पत्ता कट झाला?

आता मुनव्‍वर फारूकी आणि अभिषेक कुमार फिनालेत जाणार म्हटले तर, बिग बॉसमधून (Bigg Boss 17) अंकिता लोखंडे, अभिषेक मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांचा पत्ता कट होणार असे दिसून येत आहे. त्यात वोटिंग लिस्टमध्ये अंकिता लोखंडे सर्वांत शेवटी आली आहे. तिला फक्त 5 हजार व्होट मिळाले आहेत. त्यामुळे अंकिता, मन्नारा आणि अरुण माशेट्टी लवकरच घरातून बाहेर पडतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे बिग बाॅस17 चा विजेता नेमका कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title-  Bigg Boss 17 finale between two contestants

 महत्त्वाच्या बातम्या –

Alia Bhatt च्या साडीवर ‘रामायण’, रणबीर कपूरच्या शालची किंमत लाखोच्या घरात

लोकसभा निवडणुकीनंतर Rahul Gandhi यांना अटक होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Kangana Ranaut हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते; ‘Emergency’ मधील झलक, रिलीज डेट जाहीर

संदीप राऊत हाजीर हो…! Sanjay Raut यांच्या भावाला ईडीची नोटीस; प्रकरण काय?

ACB ची मोठी कारवाई! सरकारी अधिकाऱ्याकडे सापडली 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता