Bigg Boss 17 | सलमान खान आणि तब्बू लग्न करणार?; बिग बॉसच्या मंचावर केला खुलासा

Bigg Boss 17 | अभिनेता सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेल्या बिग बॉस 17 (Bigg Boss 17) च्या शोमध्ये अभिनेत्री तब्बूने (Tabu) हजेरी लावली आहे. तब्बूला स्पेशल गेस्ट म्हणून बोलवण्यात आले आहे. यात तब्बूने स्पर्धकांशी खूप गप्पा मारल्या. यावेळी तब्बू आणि सलमानने आपल्या लग्नाबाबत सर्वांत मोठा खुलासा केला. दोन्ही कलाकार अजूनही अविवाहित आहेत. त्यातच भाईजान सलमान खानच्या लग्नाची चाहत्यांना कित्येक वर्षांपासून प्रतिक्षा आहे.

सलमान खानचे नाव अभिनेत्री ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ यांच्यासोबत जोडले गेले. मात्र, ऐश्वर्यासोबत जोरदार भांडण झाल्यानंतर तीने अभिषेक बच्चनसोबत संसार थाटला. तर, कॅटरिना कैफनेही विकी कौशल सोबत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. त्यानंतर सलमान युलिया वंतुरसोबत डेट करत असल्याचे म्हटले गेले. मात्र, सलमान नेमकं लग्न कधी करणार याबाबत त्याने कन्फर्म असे कधीच सांगितले नाही. मात्र, बिग बॉसच्या (Bigg Boss 17) मंचावर त्याने अखेर याबाबत खुलासा केला आहे. सोबतच तब्बूनेही आपले मत सांगितले.

Bigg Boss 17 च्या मंचावर सलमान खान आणि तब्बूचा मोठा खुलासा

अभिनेत्री तब्बूने शोमधील स्पर्धकांचे कौतुक करत अंकिता लोखंडेला तीने ‘स्वीट’ असल्याचे म्हटले. तर, तिचा नवरा विकी जैनलाही तीने काही प्रश्न विचारले. तिने विकीला लग्नात किती फेरे घेतले होते, असा सवाल केला. यावर विकीने चारपेक्षा अधिकच घेतल्याचे सांगितले. मात्र, बिग बॉसमध्ये (Bigg Boss 17) सहभागी झाल्यानंतर सलमानने आम्हाला पुन्हा फेरे घेण्यास सांगितल्याचे विकीने म्हटले.

‘सलमान भाईने विचार केला असावा कि, मी नाही केलं पण तुम्ही तर करा’, असं मस्करीत विकी म्हटला. विकीच्या या खुलास्यावरच पुढे तब्बूनेही आपल्या लग्नाबाबत मोठे विधान केले. “आम्ही करत नसलो, तरी आमच्या वाट्याचे आम्ही दुसऱ्यांना करायला सांगतोय. तुम्ही लोक यातून पुढे निघून गेलात. आम्ही मात्र बाकी आहोत.”, असं हसतच तब्बू म्हणाली.

सलमान आणि अजय देवगन ‘अनमोल रत्न’

“आम्ही व्हीलचेअरवर बसून लग्न करणार, आणि तिथून पुढे लगेच अग्नीत जाणार”, असे तब्बू सलमान आणि स्वतःला उद्देशून म्हणाली. तब्बूच्या या विधानानंतर अद्याप तरी सलमान खान आणि तिचा लग्नाचा विचार नसल्याचे दिसून येते. तब्बूने बिग बॉसच्या (Bigg Boss 17) मंचावर सलमानसोबत बरीच मस्ती केली.

यासोबतच तब्बूने अजय देवगनचाही शोमध्ये उल्लेख केला. सलमान आणि अजय देवगन माझे अनमोल रत्न असल्याचे तिने सांगितले. दरम्यान, बिग बॉसचा हा सतरावा सीजन आता अंतिम फिनालेकडे वाटचाल करत आहे. येत्या 28 जानेवारीला याच्या विजेत्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

News Title- Bigg Boss 17 Salman and Tabu revelation

महत्वाच्या बातम्या- 

Uddhav Thackeray | निकालाच्या एक दिवसापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; ईडीची मोठी कारवाई

Rain Alert l राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम! ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Gautam Adani l अखेर डील पक्की…गौतम अदानींनी खरेदी केली ही मोठी कंपनी

Indian Railway Ticket Booking l आता घरबसल्या काढता येणार रेल्वे तिकीट; या स्टेप्स फॉलो करा

Ather 450 Apex Vs OLA S1 Pro l देशात इलेक्ट्रिक स्कूटरला मागणी! या दोन स्कुटर एकमेकांशी करतील स्पर्धा