प्रतिक्षा संपली!’बिग बॉस 18′ मध्ये दिसणार ‘हे’ सेलेब्रिटी, पाहा यादी

Bigg Boss 18 | बिग बॉस मराठीचा आता शेवटचा आठवडा सुरू आहे. यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.अशात बिग बॉस 18 ची सध्या जोरदार चर्चा आहे.  शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांचीही मोठी चर्चा आहे. बिग बॉस 18 शो 6 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. यामध्ये कोण-कोण सहभागी असणार, याचा खुलासा झाला आहे. (Bigg Boss 18)

बिग बॉस 18 शो सुरू होण्यापूर्वी निर्मात्यांनी दोन स्पर्धकांचे प्रोमो शेअर केले आहेत. बिग बॉसच्या घरात यंदा कोणते स्पर्धक असणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या नवीन सीजनची घोषणा होण्यापूर्वीच त्यातील स्पर्धकांबाबत चर्चा होत्या. आता बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. त्यांची नावे उघड झाली आहेत.

बिग बॉस 18 स्पर्धकांची यादी

निया शर्मा : अभिनेत्री निया शर्मा हीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. खतरों के खिलाडी 14 च्या ग्रँड फिनालेमध्ये होस्ट आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याने बिग बॉस 18 मधील पहिली सदस्य म्हणून निया शर्माच्या नावाची घोषणा केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

शोएब इब्राहीम : शोएबची पत्नी अभिनेत्री दीपिका कक्कर हिने बिग बॉस 12 सीझन जिंकला होता. आता शोएब बिग बॉस 18 मध्ये झळकणार आहे. (Bigg Boss 18)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

धीरज धुपर : ‘ससुराल सिमर का’ आणि ‘कुंडली भाग्य’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये दिसलेला अभिनेता धीरज धुपर देखील बिग बॉस 18 मध्ये दिसणार आहे.

न्यारा बॅनर्जी : अभिनेत्री न्यारा बॅनर्जीने ‘दिव्य दृष्टी’ या अलौकिक नाटक मालिकेत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. तिने “फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 13” या रिॲलिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. (Bigg Boss 18)

शहजादा धामी : ‘ये जादू है जिन का!’, ‘छोटी सरदारनी’,’शुभ शगुन’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये शहजादा धामी झळकला आहे. आता तो बिग बॉस 18 मध्ये दिसणार आहे.

शिल्पा शिरोडकर : 80 व 90 च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, शिल्पा शिरोडकर सलमान खानच्या शोमध्ये दिसणार आहे. बिग बॉसने तिचा प्रोमोही शेअर केला आहे. (Bigg Boss 18)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sameera Reddy (@reddysameera)

समीरा रेड्डी : अभिनेत्री समीरा रेड्डीचे नावही बिग बॉससाठी चर्चेत आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

News Title –  Bigg Boss 18 Contestant List

महत्त्वाच्या बातम्या-

‘हा’ स्पर्धक ठरणार ‘बिग बॉस’ मराठी 5 चा विजेता?

सोनं खरेदी करावं की नाही?, दरवाढीचं सत्र सुरूच; जाणून घ्या आजचे दर

दिवाळी गिफ्ट! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, जाणून घ्या याचे काय फायदे मिळणार!

मोठी बातमी! शिंदे गटाच्या मंत्र्याचा भीषण अपघात, पिकअपला दिली जोरदार धडक