बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्यानं माझ्या स्कर्टमध्ये हात घातला अन्…’; ‘या’ अभिनेत्रीनं सांगितलं होळी न खेळण्यामागचं धक्कादायक कारण

मुंबई | आपल्या ग्लॅमरने बाॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख बनवणारी सोफिया हयातने तिच्या आयुष्यातला बडा खुलासा केला आहे. सोफियाने होळी न खेळण्यामागचं कारण सांगितलं आहे.

एकदा बाॅलिवूडमधील अनेक सुपरस्टार्स होळी खेळायला आले होते. तेव्हा सोफियाने देखील तिथे उपस्थिती लावली होती. एवढंच नाही तर तिथे अनेक सर्वसामान्य लोक सुद्धा होती. बरेच जण येऊन सोफिया सोबत सेल्फी काढत असताना एका व्यक्तीने तिच्या स्कर्टमध्ये हात घातला. मात्र तेव्हा सोफिया भांगेच्या नशेत असल्यामुळे तिने त्याला काहीच उत्तर दिलं नाही.

भांगेच्या नशेत असलेल्या सोफियाने त्या कृतीला उत्तर न दिल्यामुळे त्या व्यक्तीची हिंमत वाढली आणि त्याने तिला उचलून घेतलं. त्यानंतर तो व्याक्ती तिला उचलून नेत असताना सोफियाच्या एका पत्रकार मित्राने तिला वाचवल्याचं सोफियानं सांगितलं. भांगेच्या नशेत असताना सोफियाला यातलं काहीच कळालं नाही. मात्र नशा उतरल्यानंतर तिला हा प्रकार समाजला.

दरम्यान, ही माहिती सोफियाने एका स्पाॅटबाॅयला दिली होती. तसेच त्यानंतर ती कधीच सेलेब्रीटींसोबत होळी खेळण्यासाठी गेली नाही. आणि फक्त तिच्या कुटुंबियांसोबत, मित्र मैत्रिणींसोबत ती होळी खेळत असल्याचं तिने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे…; महाराष्ट्राची वाट लावू नका’

शरद पवार ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल, शस्रक्रिया केली जाणार

पवार- शहा भेटीच्या चर्चेवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महावितरणची थकबाकी हे भाजपचंच पाप आहे- नितीन राऊत

मोदींनी आदेश दिल्यास माझी ममतांच्या विरोधातही लढायची तयारी – मिथुन चक्रवर्ती

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More