घराबाहेर आल्यावर अरबाजने निक्कीसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाला…

Arbaz Pate

Bigg Boss Marathi | सध्या ‘बिग बॉस मराठी’ची जोरदार चर्चा आहे. याच्या आठव्या आठवड्यात अरबाज पटेल हा घरातून बाहेर पडला. सध्या ‘बिग बॉस’चं पाचवं पर्व सुरू असून याच्या अगदी पहिल्या दिवसापासून अरबाज आणि निक्की ही जोडी चर्चेत राहिली. दोघेही घरात कायम एकत्र राहायचे. रितेश देशमुख आणि घरातील इतर सदस्यांनी अरबाजला निक्कीवरून बऱ्याचदा समज घातली.निक्कीमुळे तुझा खेळ दिसत नाहीये, असं त्याला खूपदा सांगितलं होतं. मात्र, निक्की आणि अरबाज कायमच सोबत दिसायचे. (Bigg Boss Marathi)

मागच्या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशनमध्ये निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वर्षा, सूरज आणि जान्हवी असे पाच सदस्य घरातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. त्यात अरबाजला अगोदर निरोप घ्यावा लागला. अरबाज एलिमिनेट झाल्यावर निक्की प्रचंड भावुक झाल्याची दिसून आली. पहिल्या दिवसापासून प्रत्येकाशी भांडणारी निक्की यावेळी मात्र खूपच भावुक झाली. अरबाज एलिमिनेट होताच ती ढसाढसा रडली.

अरबाजचे निक्कीसोबतचे फोटो व्हायरल

अरबाजने “सगळी भांडणं विसरून निक्कीला साथ दे… ती आता एकटी आहे” अशी विनंती जान्हवीला केली. अरबाज घराबाहेर पडणार म्हटल्यावर सर्वांनाच धक्का बसला. अरबाज स्वतः देखील खूप दुःखी होता. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. या आठवड्यात तो घराचा कॅप्टन देखील झाला होता. कॅप्टन असून घरातून एलिमिनेट होणारा अरबाज हा ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील पहिलाच सदस्य ठरला असल्याचं बिग बॉसने म्हटलं. (Bigg Boss Marathi)

अरबाजची घराबाहेर आल्यावर पहिली पोस्ट

अशात घराबाहेर पडताच अरबाजची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर अरबाजने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये निक्कीबरोबरचे एकूण सहा भावनिक फोटो पोस्ट केले आहेत. इतकंच नाही तर, त्याने एक लक्षवेधी कॅप्शन देखील दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaz Shaikh (@mr.arbazpatel)

अरबाजने शेअर केलेल्या फोटोमध्ये निक्की खूपच भावुक झाल्याची दिसून येत आहे. तो घरातून बाहेर पडणार समजताच निक्की ढसाढसा रडायलाच लागली.  तिला यामुळे मोठा धक्का बसला. अरबाजने या प्रसंगाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये हार्टब्रेक, भावुक झालेला इमोजी तसेच पुढे…कोमजलेल्या फुलाचा इमोजी शेअर केला आहे. कॅप्शनखाली अरबाजने ‘बिग बॉस मराठी’, ‘निक्की तांबोळी’ आणि ‘मिस्टर अरबाज पटेल’ असे हॅशटॅग वापरले आहेत. सोबतच त्याने या पोस्टला ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘रांझा’ गाणं लावलं आहे. त्याची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. (Bigg Boss Marathi)

News Title-  Bigg Boss Marathi arbaz patel shares emotional photos with nikki 

महत्वाच्या बातम्या-

नवरात्रीत शनि नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं भाग्य उजळणार

बंगळुरूतील घटनेनं देशभर खळबळ, फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे 30 तुकडे

मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीराजे घेणार भेट

“आमचं चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होण्याची गॅरंटी”

आज ‘या’ राशींवर राहणार महादेवाची कृपा; सर्व इच्छा-आकांक्षा होणार पूर्ण!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .