निक्कीच्या ‘त्या’ वागण्यामुळे अरबाजने घरात केली तोडफोड; बिग बॉस काय करणार?

Bigg Boss Marathi l ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलाच चर्चेत आहे. या सीझनने बिग बॉस मराठीच्या सर्व इतिहासात सर्व रेकॉर्ड ब्रेक करून चांगला TRP देखील मिळवला आहे. अशातच आता या आठवड्यात बिग बॉसने स्पर्धकांना जोड्यांमध्ये गुंतवले आहे. यामध्ये सर्वात चर्चेत असलेली जोडी म्हणजे निक्की तांबोळी आणि अभिजित सावंत. निक्की आणि अभिजीतच्या या मैत्रीचा परिणाम संपूर्ण गेमवर होणार असल्याचा आक्षेप दोन्ही ग्रुपमधील सदस्यांना घेतला आहे. त्यामुळे आता या जोडीमुळे घरात नेमकं काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच लक्ष लागल आहे.

अरबाज पटेलने घरात आदळआपट :

आज बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंतची दिल दोस्ती दुनियादारी अरबाजला प्रचंड खटकत आहे. कारण बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, निक्की आणि अभिजीत स्वयंपाक बनवताना दिसत आहे. दरम्यान त्यावेळी निक्की हसल्यामुळे अरबाज तिला “हसत आहेस” असं म्हणत अरबाज भांडी फोडताना दिसत आहे.

तसेच बिग बॉसच्या मराठीच्या या आठवड्यात ग्रुप ए फुटलेला दिसत आहे. अशातच आता अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीमध्ये जोरदार वादावादी झाली आहे. त्यामुळे अरबाजने या रागातून घरातील वस्तूंची देखील आदळाआपट केली आहे.

Bigg Boss Marathi l बिग बॉस अरबाजाला काय शिक्षा देणार? :

यावेळी अरबाज म्हणतो की, निक्की तू मला अशा वागण्याने हर्ट करत आहेस. निक्की म्हणते की, तुला माझी गरज नाहीये. यावर अरबाज म्हणतो,”नाही आहे… आता हे पाहून तर अजिबातच नाहीये. अरबाज पटेलला उत्तर देत निक्की म्हणते की, हे असं स्पष्ट बोलायचं माझ्यासोबत. कारण निक्की आणि अभिजीत सावंतची मैत्री अरबाज पटेलला सहन होत नाही. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात तो प्रचंड दुखावला आहे. त्यामुळे त्यांनी भांडी फोडून, वस्तूंची आदळाआपट देखील केली आहे असे व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

मात्र आता सर्व प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की, अरबाजने घरातील वस्तूंची तोडफोड केली आहे. त्यामुळे अरबाजला काय शिक्षा होऊ शकते. तर बिग बॉसच्या घरातील वस्तूंचे नुकसान केल्यास बिग बॉस घरातील सदस्यांवर कठोरात कठोर कारवाई करत असतात. तर याआधीच्या सीझनमध्ये दिसून आले आहे की, काही सदस्यांना घरातील जेलमध्ये देखील टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता अरबाज पटेलने घरातील वस्तूंची तोडफोड केल्याने बिग बॉस त्याच्यावर कोणती कारवाई करतील, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

News Title – Bigg Boss Marathi Season 5 Angry Arbaz Patel

महत्त्वाच्या बातम्या-

बँकेत नोकरी करायचं स्वप्न होणार साकार; तब्ब्ल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु

“राजे माफ करा..”; शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रितेश देशमुखची पोस्ट

पुढील 48 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

दहीहंडीला मिळाली आनंदवार्ता! सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या आजचे दर

BCCI चं ऐतिहासिक पाऊल, क्रिकेटपटूंसाठी जय शाह यांची सर्वात मोठी घोषणा!