“बायकांनी दोन पतींची इच्छा व्यक्त केली तर…”; प्रसिद्ध अभिनेत्री भडकली

Bigg Boss OTT 3 | ‘बिग बॉस ओटीटी’चा नवा सीझन सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आला आहे. या सीझनमध्ये युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन बायकांना घेऊन सहभागी झाला आहे. त्याच्या दोन पत्नी पायल आणि कृतिका यामुळे सध्या अरमानची खूपच चर्चा रंगली आहे.

नुकतंच त्याने एक विधान केलं होतं, ज्यामुळे अरमानवर प्रचंड टीका केली जात आहे. प्रत्येक पुरुषाला वाटतं की त्याच्या दोन बायका असाव्यात, असं अरमान म्हणाला होता. मात्र, त्याचं हे वक्तव्य अभिनेत्री देवोलिनाला चांगलंच खटकलं आहे.

देवोलिनाने थेट सोशल मीडियावर एक पोस्ट करत संताप व्यक्त केलाय. इतकंच नाही तर, तिने बीग बॉस निर्मात्यांनाही सुनावलं आहे. “बिग बॉसवर इतके वाईट दिवस आलेत का?”, असा संतप्त सवाल देवोलिनाने केलाय.

देवोलिनाची पोस्ट प्रचंड चर्चेत

प्रत्येक पुरुषाबाबत मी सांगू शकत नाही. पण, अश्लील हेतू असणाऱ्या पुरुषांना नक्कीच २,३, ४ बायका हव्या असतात. कृपा करून हा गलिच्छपणा थांबवा.जेव्हा त्या बायका त्यांनादेखील दोन पती हवे असल्याच्या इच्छा व्यक्त करतील, तेव्हा ते देखील बघताना आनंद व्यक्त करा.

मला वाटत नाही तो दिवस पण दूर असेल…तेव्हा मला “हे त्यांचं आयुष्य आहे. जर ते एकत्र आनंदी आहेत, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?” असं म्हणणाऱ्यांना बघायला आवडेल. हे कर्मा सायकल अशाच पद्धतीने काम करतं. जेव्हा एक मुलगी दोन मुलांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करेल आणि त्यांना खूश ठेवेन असं सांगेल…तेव्हा तुमच्यापैकी किती लोक तिला पाठिंबा देतात हे मला पाहायचं आहे. तेव्हा तुम्ही तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवाल. (Bigg Boss OTT 3)

“बायकांनी 2 पतींची इच्छा दर्शवली तर..”

एक समाज म्हणून आपण चुकीच्या मार्गावर आहोत…काही वर्षांपासून चुकीच्या गोष्टी चालत आल्या असतील, तर त्या पुढे चालवण्याची गरज नाही. यामुळे प्रत्येक चुकीची गोष्ट बरोबर आहे, असा अर्थ होतो. माझ्यासाठी हे चुकीचं आहे. एकापेक्षा जास्त पत्नी असणंदेखील चुकीचं आहे आणि ते चुकीचंच राहील. पण, काय करणार…काही लोक असे आहेत, जोपर्यंत स्वत: खड्ड्यात पडत नाहीत, तोपर्यंत त्यांना समजत नाही…ऑल द बेस्ट! अशी पोस्ट करत देवोलिनाने संताप व्यक्त केलाय. (Bigg Boss OTT 3)

News Title –  Bigg Boss OTT 3 Devolina post in discussion

महत्त्वाच्या बातम्या

“मागून येणाऱ्यांना अगोदर संधी मिळते हे वाईट”; एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

पुण्याहून कोकणभागात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर!

फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये, नेमकी काय चर्चा झाली?

करिना कपूरच्या सासूने केला मोठा खुलासा!

“राम मंदिराला गळती, पेपरला गळती..”; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे कडाडले